दापूर ग्रामपंचायत यांच्या मार्फत मुख्यमंत्री ग्रामपंचायत अभियाना अंतर्गत गावातील महिलांची विशेष सभा घेण्यात आली त्यामध्ये समाजात चालत असलेली विधवा महिला ही एक अनिष्ट प्रथा बंद करण्यासाठी सर्व महिलांनी पुढाकार घेतला व येथून पुढे गावात कुठल्याही महिलेच्या पतीचे निधन झाल्यास तिचे कुंकू पुसणे, बांगड्या फोडणे गळ्यातील मंगळसूत्र तोडणे, पायातील जोडवे काढणे इत्यादी प्रथा बंद करण्याच्या सर्व महिलांनी यावेळेस ठराव केला व कार्यक्रमातून विधवा महिलांचे शाल श्रीफळ बांगड्या देऊन व हळदीकुंकू लावून व वान देऊन सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक दापूर ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी प्रवीण बुरसे यांनी केले, त्यानंतर विधवा महिलांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले त्यावेळी त्यांना येणाऱ्या अडचणी सांगितल्या त्या ऐकून सर्वांच्या डोळ्यात अश्रू आले व शेवटी महिलांनी विधवा महिला अनिष्ट प्रथा आहे व ती बंद केलीच पाहिजे अशी शपथ घेतली.